बाळू जोशी वाकडी.ता.जामनेर.
दि 12 रोजी सकाळी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय चाळीसगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ सौ साधना निकम मॅडम यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले तसेच प्रा. प्रियांका देवरे यांनी प्रास्ताविक केले व राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती दिली.आणि प्रा. निलेश निकम सर यांनी इतीहासच बदल घडवू शकतो असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थांना दिला. त्यानंतर एफ वाय बीएस्सी ची विद्यार्थिनी वर्षा चांदिले या विद्यार्थिनीने तारुण्य भान राखत आपले धेय्य कसे गाठता येईल असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ सौ साधना निकम मॅडम यांनी सांगितले की राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्काराची आज गरज आहे व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन युवक पिढीने त्यांचा ऊर्जेचा विधायक वापर करत धेय्य गाठले पाहिजे.सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रा.प्रियंका देवरे यांनी केले .या कार्यक्रमाला श्री दर्शन पाटील, प्राजक्ता जोशी ,तनुजा करपे सानिका अमृतकार राजश्री महाजन गायत्री बडगुजर वर्षा चांदीले आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments