Type Here to Get Search Results !

आंबे वडगाव येथे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा करून अंत.कुटूंबाचा मन हेलावणारा आक्रोश!! गावात शोककळा.


शेंदूर्णी येथून जवळच असलेल्या व जामनेर पाचोरा रोडवर असणाऱ्या आंबे वडगांव येथे काल खूप दुर्दैवी घटना घडली आहे. विजेचा जोरदार धक्का लागून एक गरीब शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील अल्पभूधारक शेतकरी भागवत उखर्डू पाटील वय वर्षे (६२) हे त्यांच्या मालकीच्या सार्वे शिवारातील गट नंबर १७४ मध्ये नियमितपणे सकाळी अकरा ते  साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतीकाम करण्यासाठी गेले असता त्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर जवळून जात असतांनाच अचानकपणे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला व काही कळायच्या आतच ते जमीनीवर कोसळले ही घटना घडली तेव्हा त्यांचा मुलगा भावेश हा नुकताच जेवणाचे डबे घेण्यासाठी घरी आलेला होता.

भावेश हा घरुन डबे घेऊन शेतात गेला असता त्याला त्याचे वडील भागवत पाटील हे जमीनीवर पडलेले दिसून आले हे दृष्य पाहून भावेश याने प्रसंगसावधानता दाखवत नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी व मदतीसाठी शेजारच्या शेतकऱ्यांना आवाज देऊन बोलावून घेतले व नंतर जवळ जाऊन पाहिले असता भागवत पाटील हे मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने त्याच्या नातेवाईकांना घटना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वडगाव आंबे गावाच्या पोलीस पाटील सौ. रेखाताई वाघ यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे व चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून रितसर शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments