शहादा :-: - सकाळ प्रहरी काळजाचा थरकाप उडवणारी घटना… ५७ जण प्रवास करत असलेली बस ताम्हिणी घाटात पलटल्याने २ जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त खासगी बस पुण्याहून कोकणाकडे सहलीसाठी निघाली होते. शनिवारी पहाटे बस माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हिणी घाटात पोहोचली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बस घाटात उलटली. त्यात शहादा तालुक्यातील मंदाणे येथील सुरभी रवींद्र मोरे (२२) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भीषण अपघात होऊन दोन तरुणी ठार , तर ५७ जण जखमी झाले आहेत . माणगाव तालुक्यातील पुणे – दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला . खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे .
या अपघातात मृतांमध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. त्यातील एक शहादा तालुक्यातील मंदाणे येथील सुरभी रवींद्र मोरे (२२) व कांचन मारुती पाटील (२०) रा . सावरगाव गेट , ता . भोकर , जि . नाशिक या दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये मंदाणे येथील अन्य दोघांचा समावेश आहे. मंदाणे येथील सुरभी मोरे , लक्ष्मी मोरे यांनी या २० डिसेंबर पुणे येथील सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथील एसीएच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत इंटरव्ह्यू दिली होती. त्यात त्यांची निवड होऊन ते दि. २४ डिसेंबर रोजी त्या कंपनीत रुजू झालेत त्यानंतर त्यांचा पाच दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केली होती. त्यांच्यासह मंदाणे येथील तरुण धीरज कुवर हा त्या कंपनीत आधी पासून रुजू होता. तो देखील या सहलीत सहभागी होता. सुरभी व लक्ष्मी या दोघांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे त्या कंपनीची सहल निघाली होती. सहलीच्या स्थळ पर्यंत पोहोचण्याआधीच शनिवारी अवघ्या तीन तासांच्या प्रवासानंतर ताम्हिनी घाटात बसचा अपघात झाला . अपघाताची घटना मंदाणे गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावात शोककळा पसरली.
पुणे जिल्ह्यातील सोलापूर रोडवर लोणी काळभोर येथील एसीएच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील ५५ कर्मचारी बसचालक व क्लिनर असे एकूण ५७ प्रवासी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते. ताम्हिणी घाटातील मौजे कोंडेथर गावच्या हद्दीतील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला . या अपघातात कांचन व सुरभी यांचा मृत्यू झाला , तर इतर प्रवासी जखमी झालेत . यात २९ पुरुष व २४ महिलांचा समावेश आहे .
या जखमींमध्ये धीरज कूवर आणि लक्ष्मी मोरे यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पो . नि . राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस , रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली . स्थानिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठविण्यात आले होते. बसचालकास अपघात होण्याआधी काही प्रवाशांनी गाडी हळू चालवण्यास सांगितले होते . पण चालकाच्या बेजाबाबदारीमुळे हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments