जळगाव प्रतिनिधी दि. -1 शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. असाच एक प्रसंगी धरणगाव तालुक्यातील वराड येथील अनुजा राजु करे या विद्यार्थीनीसोबत घडणार होता. प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दातृत्त्वामुळे तिचे शिक्षण थांबण्याची वेळ टळली आहे. अनुजा ही फॅशन डिझाईनिंगच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण बेंडाळे महिला महाविद्यालयातून घेते आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तीला शिक्षण सोडावे लागणार होते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यांनी सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थेट वराड या गावात जाऊन अनुजाला शिक्षणासाठी तसेच याच गावातील एका दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी देखील आर्थिक मदत केली. या दोन्ही सकारात्मक पुढकारामुळे मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जळके गावाचे सरपंच राजुभैय्या पाटील, वराडचे सरपंच नितीन जाधव, उपसरपंच राजु जाधव, वडली गावाचे माजी सरपंच सचिन पाटील आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments