राज्यभरातील ग्रामपंचायत 18 डिसेंबर पासून दोन दिवस बंद आशा प्रकारच्या बातम्या छापून आणून स्वतः ची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न सुरुअसून नोंदणी नसलेल्या व ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या निवडणुकीत स्व च्या गावात पराभूत झालेल्या बोगस संघटनेच्या स्वयं घोषित अध्यक्ष यांनी आपली संघटना सरकाऱी नियमानुसार नोंदणी करावी व नंतर कायदेशीर मार्गाने लढा उभारवा ग्रामपंचायत बंद ठेवण्याची भाषा करू नये आपल्या संघटनेची नोंदणी दाखवावी आणि माझ्याकडून दोन लाख रुपय घेऊन जावेत असे खुले आवाहन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी केले आहे राज्यात सरपंच परिषद मंबई महाराष्ट्र ही सरपंचाची परिषद काम करत असून गेल्या महिन्यात पद्दमश्री पोपटराव पवार, परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष ऍड विकास जाधव सर्व राज्यकार्यकारणी सदस्य यांची मुंबईत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन याची मुंबईत बैठक ग्रामपंचायत, तसेच संगणक चालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रश्नावर बैठक झाली त्या बैठकीस मी स्वतः उपस्थित होतो या बैठकी पूर्वी सरपंच परिषदेने सरकारचे लक्ष गावगाड्याच्या मागण्यावर वेधण्यासाठी कराड ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता सरकारने मंत्री सावे व पाच आमदार यांना पाठवून सातारा येथे 80 किलोमीटर हा मोर्चा आल्यावर सरकारच्या वतीने प्रश्न सोडविन्याचे आश्वासन दिले या नंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत ग्रामविकासचे प्रधान सचिव यांच्या सोबत सह्याद्री अतिथीग्रह मुबंई येथे दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वात बैठक होऊन गावगाड्याच्या प्रश्नावर सरकार दरबारी कार्यवाही सुरु असताना बोगस असणाऱ्या व गाव पातळी वर काम नसणाऱ्या संघटनेने ग्रामपंचायत बंद ची हाक दिल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात छापून आणल्या आहेत व त्या शोशल मीडियावर टाकून सभ्रम निर्माण करत आहेत या बंद शी राज्य सरपंच परिषदेचा कुठलाही सबध नाही राज्यातील कुठलीच ग्रामपंचायत बंद राहणार नाही असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बाळासाहेब धुमाळ यांनी म्हटले आहे.
Post a Comment
0 Comments