महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव व राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत. समता शिक्षक परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी डॉक्टर.जे.जी.पंडित.विद्यालय लोहारा विद्यालयाचे उपशिक्षक सादिक प्यारखा तडवी. यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी, डॉक्टर.जे.जी.पंडित.विद्यालय शाळेचे उपशिक्षक प्रवीण मोहन पाटील यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य प्रदेश अध्यक्ष भरत शिरसाठ यांची प्रमुखउपस्थिती होती याप्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्ष रणजीत सोनवणे व जिल्हा उपाध्यक्ष गणेश बच्छाव यांच्यासह जामनेर तालुका समता शिक्षक परिषद यांच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments