माणुसकी समुहाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व सेवा गौरव पुरस्कार सोहळा ,२९ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार.
विषेश आकर्षन सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल राठोड महाराज यांचे माणुसकी या विषयावर व्याख्यान, ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने यांची मुख अभिनय
महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या माणुसकी रुग्ण सेवा समुह व सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या वर्धापन दिनानिमित्त्याने सेवा गौरव पुरस्कार सोहळा व कु.लक्ष्मी सुमित पंडित हिच्या नवव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.विविध क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४२ नामवंत आदर्श व्यक्तींची सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड समीती तर्फे निवड करण्यात आली आहे. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती , श्रीमती अंजली धानोरकर उप जिल्हाधिकारी,
नामदेवराव जाधव साहेब मा.जिल्हाधिकारी,
नंदा गायकवाड उपायुक्त म.न.पा.आनिता शिंदे,
लेखा.अधीकारी विभागीय आयुक्त कार्यालय,
डॉ सुरेश हरबडे वैद्यकीय अधिक्षक घाटी,
प्रसाद देशपांडे सर प्रा.वि.प्र.मनोविकृतीशास्र विभाग घाटी,
मा.स.सो.खंडाळकर, वरिष्ठ पत्रकार मा.अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक, मा.प्रशांत पोतदार पोलिस निरीक्षक मा.ब्रम्हा गीरी
पोलिस निरीक्षक ,देविदास वाघमोडे,आरती जाधव स.पो.नी.वर्षा व्हगाडे,
स.पो.नी.सुचेता देशपांडे भारुड रत्न,
श्री दिपकपाल भांडेकर महाराज,ह.भ.प.रामेश्वर पवार महाराज,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षन सप्तखंजेरी वादक प्रभोदनकर पंकजपाल राठोड महाराज यांचे माणुसकी या विषयावर व्याख्यान,ज्युनिअर चार्ली फॉडेंशन चे कलाकार सोमनाथ स्वभावने यांच्या मैफिलीचा कार्यक्रम देखील आयोजीत केला आहे.हा कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केद्र टि.व्ही सेंटर संभाजीनगर येथे शुक्रवार दि. २९-१२-२०२३.-रोजी दुपारी १२:०० ते ०२:०० पर्यत रक्तदान शिबीराने सुरवात होइल.दुपारी ०२:०० वा.सेवा गौरव पुरस्कार सोहळ्याला सुरवात होणार आहे, माणुसकी समुहाच्या वतीने शासकीय रुग्णालयात गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात येणार आहे.तसेच संभाजीनगर शहरातील दानशुर रक्त दात्यांनी शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी साठी जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आव्हान माणुसकी समुहातर्फे समाजसेवक सुमित पंडित यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments