पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 नेरी ता. जामनेर कार्यक्षेत्रातील रोटवद येथे राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान अंतर्गत वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ वाहेद तडवी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे होते .
महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्ती चे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे गावाचे सरपंच श्री गायकवाड, प्रमूख पाहुणे डॉ. सलीम तडवी पशुधन विकास अधिकारी भुसावळ, डॉ. श्रीकांत व्यवहारे साहेब सहाय्यक आयुक्त जामनेर डॉ. एकनाथ खोडके सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण चौधरी सहायक पशुधन विकास अधिकारी नेरी डॉ. संदीप पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी नाचणखेडा हे होते.
वंधत्वाची कारणे व प्रकार, करण्यात येणाऱ्या उपायोजना वंधत्वामुळे होणारे पशुपालकाचे नुकसान, कृत्रिम रेतन जंतनिर्मूलन याबाबत सविस्तर माहिती डॉ. वाहेद तडवी, जिल्हा पशुंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी सांगितले व कृत्रिम रेतन करून जातिवंत कालवड पारड्या तयार करा असे आव्हान पशुपालकांना केले.
पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती डॉ. श्रीकांत व्यवहारे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जामनेर यांनी दिली .
यावेळी श्री विश्वास बावस्कर सर व श्री प्रसाद राजू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वंधत्व तपासणी डॉ. वाहिद तडवी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद जळगाव डॉ. श्रीकांत व्यवहारे डॉ एकनाथ खोडके डॉ संदीप पाटील यांनी केली, त्यांना मदत डॉ. प्रवीण चौधरी डॉ दीपक पाटील नांद्रे डॉ. नरेंद्र गोसावी डॉ योगेश चव्हाण श्री महाजन श्री अमोल पाटील पांढरे परिचर यांनी केले.
यावेळी श्री अतुल बोकडे माजी सरपंच श्री देशमुख दादा विश्वास बावस्कर श्री राजू पाटील श्री पंडित आगळे श्री कैलाश दांडगे, श्री गजानन पाटील, श्री रमेश पाटील, श्री सुनील पाटील, श्री अतुल पाटील, श्री अशोक पाटील, श्री विनायक पाटील व गावातील ग्रामस्थ पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप पाटील यांनी केले व श्री प्रसाद पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून आभार व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments