जळगाव: मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्षा तर्फे उद्योजकांचा विकास व्हावा व नविन उद्योजक तयार व्हावेत या अनुशंगाने दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ८ ते १० यावेळेत मराठा उद्योग कक्षाची बैठक संपन्न झाली
सदर बैठकीत उद्योजकांना शासकीय प्रणालीत टेंडर कशी भरावे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते शासकीय टेंडरच्या वेबसाईट कोणकोणते आहेत या संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळा मराठा उद्योजक कक्षाचे उपाध्यक्ष तसेच जेम व महाटेंडर प्रणालीचे कन्सल्टंट श्री जयंत हिरालाल पाटील यांनी घेतली. व उद्योजकांना आवाहन केले आहे की ज्यांनाही शासकीय टेंडरच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल त्यांनी संपर्क साधावा मराठी उद्योजकांसाठी त्यांचा मदतीचा हात सदर पुढे राहणार आहे. तसेच नव उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पवार क्रेन सर्विसेस चे संचालक माननीय श्री सुकलाल गजमल पवार साहेब यांना त्यांच्या व्यवसायातील खडतर प्रवासातून यशस्वीतेकडे आलेल्या व्यवसायाची आपबीती उद्योजकांना प्रोत्साहनपर आकर्षण ठरले. एवढेच नाही तर आज रोजी सुरू असलेल्या बडोदा येथील मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशनातून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब व सहकारी जळगाव जिल्हा मराठा उद्योजक कक्षाचे अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे मार्गदर्शन केले.
प्रस्ताविक उद्योग कशाचे महानगर अध्यक्ष घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर पाटील त्यांनी केले कार्यशाळेला माननीय श्री बाळासाहेब सूर्यवंशी व माननीय श्री बच्छाव बापू यांच्यासोबत मोठ्या संख्येत मराठा उद्योजक उपस्थित होते.
उद्योजक कक्षात सहभागी होण्याकरिता संपर्क :-जयंत पाटील :- ८४११८८३४११
Post a Comment
0 Comments