जामनेर :-: अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन,विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे,विद्यार्थ्यांची अध्ययन गती वाढविणे,शिकण्यात तंत्रज्ञानाचा वापर करणे या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन दिले तर शिक्षकांचे श्रम निम्म्यावर,परिणाम दुप्पट, तर आनंद तिप्पट मिळेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणविस्तार अधिकारी विजय सरोदे यांनी केले.
स्टार प्रोजेक्ट्स अंतर्गत शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव येथील डायटच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. हे प्रशिक्षण इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय जामनेर येथे सुरू आहे.
विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करणे यासाठी योग्य प्रकारच्या अध्ययन प्रक्रिया वर्गामध्ये कशा वापराव्यात याबाबतची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात करायला हवीत या उद्देशाने अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व शाळांपर्यंत, सर्व शिक्षकांपर्यंत व शिक्षकांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी पर्यंत पोहोचणे व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसोबतच, विद्यार्थ्यांना सुजाण, जबाबदार नागरिक बनवणे, तसेच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे..
जामनेर तालुक्यातील शिक्षकांना नाशिक येथून विभागीय प्रशिक्षण घेऊन आलेले ९ सुलभक या प्रशिक्षणात तीन कुलात प्राथमिक,खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील १५० शिक्षकांसाठी तीन कुल तयार करून विजय सरोदे,महेंद्र नाईक,पंकज रानोटकर,शुभांगी पाटील,रत्नाकर सुतार,सैय्यदअली अल्ताफअली,विशाल पाटील,राहुल सपकाळ,गोपाल पाटील हे सुलभक मार्गदर्शन करत आहे.
सदर प्रशिक्षण दरम्यान विभागीय सुलभक पंडित बाविस्कर,संदीप सोनार तसेच केंद्रप्रमुख संजय पाटील,सुरेश अंभोरे,शेख रईस,सुदाम चव्हाण तसेच ललवाणी शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
अभिप्राय -
२१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही.अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल कसा करावा अश्या बऱ्याच बाबी आम्ही प्रशिक्षणात अनुभवतो आहे.
- भानुदास पाटील.
(प्रशिक्षणार्थी कुल क्रं-३)
Post a Comment
0 Comments