या वर्षी कापूस उत्पन्नात निम्मे घट झाल्याने जळगांव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पिक म्हणून ओळख असलेले कापसाचे पिक आता शेतकऱ्यांना नकोसे वाटत आठवडी आहे. बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी होत आहे. ( पाच हजार अशा कवडी मोल ..) सरकार हमी भाव देईना, कापुस विकण्याची निसर्ग साथ देईना, त्यामुळे बिकट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.कापूस उत्पादक शेतकरी असल्याने शेतकरी हैराण झाला असून,मोठ्या आर्थिक संकटात झाला आहे.
निसर्ग ही मागील वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पाठीशी हात धुवून लागला आहे. मागील वर्षांपासून कापसाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यासमोर यंदा कर्जाचा डोंगर उभा आहे. कापूस उत्पादनातही एकामागुन एक संकटाची मोठी घट झाल्याने मालीका सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी शेत मजुर यंदाही होणार खर्चही भरून निघत नसून, पूर्णपणे हतबल झाले आहे. सध्या शेतकऱ्यांना बाजारात कापसाला चार ते सात हजार भाव मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव असल्याने खर्चही काढता आला नाही. खते व बियाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याने खर्च केला आहे.
सध्या महागाईचा चढता आलेख बघता शेतकऱ्यांनी निंदाई, कापसाला कोळपणी, औषधी फवारणी दहा ते बारा हजार रुपये प्रती
क्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु याकडे लक्ष घालायला सरकारला वेळच मिळत नाही. संध्या शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. तर एकिकडे निर्सग तर दुसरीकडे सरकार अशा अडचणीत शेतकरी राजा सापडला आहे.
निवडणुकीत भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना आश्वासन देणाऱ्या मंत्रीना हा कसा विसर पडला?? शेतकऱ्यांना कमीत कमी 12 हजार रुपये तरी कपाशीला भाव पाहिजे.अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे.
Post a Comment
0 Comments