चोपडा,:-: धनवाडी शिवारात दाम्पत्यामधील कौटुंबिक वादविवादातून पतीने धारदार शस्राने वार करून पत्नीची हत्या करून पसार झाल्याची खळबळजनक धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली आहे.
हत्येनंतर संशयित पसार झाला होता. मात्र त्यांची मुले आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होती. दरम्यान मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
रेखाबाई दुरसिंग बारेला (वय ४४) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान, फरार झालेल्या संशयित पती दुरसिंग बारेला यास चोपडा पोलिसांनी २४ तासाच्या आता बेड्या ठोकल्या.बारेला दाम्पत्य हे धनवाडी शिवारातील योगीराज पाटील यांच्या शेतात वास्तव्यास होते. दरम्यान रेखाबाई बारेला यांची पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला. मात्र त्यांची मुले आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होती.
Post a Comment
0 Comments