Type Here to Get Search Results !

नांद्रा हवेली गावातील पेयजेल योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई साठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण. कॅप्शन-अधिकाऱ्यांनी इतक्या दिवसात केले काय पाण्याच्या टाकीचे फक्त उभे चार पाय.



कृष्णा पाटील --::--    जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावासाठी सुमारे ५ वर्षा पूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजुर झालेली होती  या योजनेत भ्रष्ट्राचार झालेला असून अद्याप येथील काम पुर्ण झालेले नाही त्यामुळे कामाचे ठेकेदार नितु ठाकुर यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी येथील सजग ग्रामस्थ राधेश्याम विठ्ठल खवले यांनी आज पासुन पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे .


गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की, येथील पेयजेल योजनेसाठी १४,४४,२८१ रुपयांचा निधी मंजूर असुन त्या पैकी ६ लाख रुपये निधी काढण्यात आला आहे या निधी मधुन  जलकुंभ पाण्याची टाकीचे काम झालेले नाही नांद्रा हवेली ग्रामस्थांनी यापूर्वी देखील  ठेकेदार निटु ठाकुर यांना वारंवार विनंती करून काम पुर्ण करण्याची मागणी केलेली असून त्यांनी मात्र नांद्रा हवेली ग्रामस्थांना  ८ दिवसात काम सुरु करण्पाचे आश्वासन दिले परंतु ८ महिने पूर्ण होऊन सुद्धा कामाला सुरुवात झालेले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्या वाचुन वंचित राहत असुन या योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उपोषकर्ते राधेश्याम विठ्ठल खवले यांनी केला आहे. 

भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी त्यांनी आज पासुन जामनेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे  त्यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांसह परिसरातून  विविध राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे परंतु दिवसभर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांना पाहून संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रशासनाला जाग आली व त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उप बांधकाम विभाग अभियंता व इतर कर्मचारी अधिकारी यांनी पुढील दहा ते पंधरा दिवसात काम पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन पत्र देऊन तूर्तास उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments