Type Here to Get Search Results !

खडकदेवळा येथे आज नवीन वर्षाची सुरुवात अध्यात्मिक निरंकारी सत्संगाने!!


सुनील लोहार, कुऱ्हाड .

  येथून जवळच असलेल्या खडकदेवळा येथे दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात अध्यात्मिक निरंकारी सत्संगाने होत असते  सविस्तर वृत्त असे की जिकडे तिकडे नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने सुरुवात होते पण ते खरंच आनंद उपभोगतात का याचा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो 31 डिसेंबरच्या रात्री नको ते विषय, नको ते खाणं, यामुळे जीवनशैली खराब होत आहे. जीवनशैली सुधरावी, आपलं आरोग्य सूदृढ राहावं, दीर्घायु व्हावं जीवन जगताना त्या जीवनामध्ये आनंद यावा, सखून यावा प्रत्येक घराघरांमध्ये प्रेम वाढावं, शेजाऱ्या पाजारामध्ये दिवसेंदिवस होत असलेला दुरावा दूर व्हावा, प्रेमाची कमतरता पडल्यामुळे सासु सुनेच्या भानगडी, मुलगा बापाचा ऐकत नाही अशा घटना रोजच पाहायला मिळत आहे. भाऊबंदीच्या शेतीच्या वादातून खून होत आहेत अशा या सर्व घटना रोखण्यासाठी अध्यात्मिक शांततेची गरज आहे, त्याचाच एक भाग म्हणून निरंकारी मिशनचे वर्तमान सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेव जी महाराज यांच्या असीम कृपेने खडकदेवळा नगरीमध्ये  एक जानेवारी २०२४ रोजी निरंकारी सत्संगाचा आयोजन व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. यावेळी सत्संग व प्रवचनासाठी  मुंबई येथून विश्वासजी भोसले ज्ञान प्रचारक महाराज खडक देवळा येथे येणार आहेत. तसेच दिनांक 31 डिसेंबर रोजी निरंकारी मंडळातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले . दिनांक तसेच एक जानेवारी 2024 रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत निरंकारी सत्संगाचा कार्यक्रम सुरू राहील, या  सत्संग मध्ये विचार व गीत मांडून दुभंगलेल्या व व्यसनाधीन झालेल्या समाजाला वळणावर कसे आणता येईल याचे  सखोल मार्गदर्शन या सत्संगमध्ये केल्या जाईल. सत्संग समाप्तीनंतर ज्ञानदान म्हणजेच गुरूची ओळख करून दिली जाईल.  कार्यक्रमासाठी पाचोरा तालुक्यासह भडगाव चाळीसगाव ,एरंडोल जळगाव ,जामनेर ,सोयगाव तालुक्यातील संत महात्मा उपस्थित राहणार आहेत तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी  या अध्यात्मिक सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन निरंकारी मिशनचे धुळे झोन प्रमुख हिरालालजी पाटील, पाचोरा सेक्टरचे संचालक महेश शिवाजी वाघ व खडक देवळा निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी केलेले आहे .

Post a Comment

0 Comments