Type Here to Get Search Results !

जो दुसऱ्याचे सुख दुःख वाटून घेतो तोच खरा माणूस .....दीपक पाल भांडेकर महाराज सप्त खंजेरीवादक....

 माणुसकी समूहाचा सातवा वर्धापन दिन रक्तदान शिबिर व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्सात साजरा.

 


 सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर ११ दात्यांनी रक्तदान केले. तथा विविध सामाजिक क्षेत्रातील ४२ व्यक्तींना  सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्रात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेसमाज प्रबोधनकार, दिपक पाल भांडेकर महाराज, ज्येष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर  , स.पो.नि. आरती जाधव,  स.पो.नि वर्षा व्हगाडे ,स.पो.नि. देविदास वाघमोडे , 

ह.भ.प. सुचिता देशपांडे, उपस्थित  होते .

,स.पो.नि.आरती जाधव  यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शन करतांना आरती जाधव म्हणाल्या की मी सध्या दामिनी पथकात काम करते माझ्याकडे दररोज अनेक व्यक्ती येतात सासु त्रास देते.सुना सांभाळत नाही. 

असे विदारक समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत ,  मी गेल्या दहा दिवसांपूर्वी माणुसकी वृद्धाश्रम भेट दिली त्यावेळेस पाहिले की दुर्गम ठिकाणी सुमित पंडीत व पुजा पंडीत  मुलांसह  वृद्ध निराधारांच्या सेवेसाठी   राहतात, काम करतांना माझ्या निदर्शनास येते की सासु सुचनांचे अनेक वाद असतात घरचे सुद्धा सांभाळत नाही पण हे दांपत्य रस्त्यावर वर सापडलेल्या निराधार वृध्दांचा सांभाळत करतात मला ही मावली पुजा पंडीत मध्ये खऱ्या अर्थाने आजची सिंधुताई सपकाळ दिसतेय,   यांच्या कार्याला आमचा सेल्युट आहे , 

स.पो. नि. देविदास वाघमोडे बोलतांना म्हणाले की सुमित पंडीत समाज सेवे सोबतच  वाहतूक सुरक्षेसाठी जनजागरण करतात,

बेटी बचाव,

 रक्तदान शिबिर,

व्यसन मुक्ती,हुंडाबंदी,

सामाजिक कुप्रथेवर चार्लीच्या भुमिकेत पथनाट्य सादर करतात, व समाज जागृती करतात,यावेळी अनेक मान्यवरांनी सुमीत पंडीत यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला,या प्रसंगी  कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ४२ व्यक्तीनां  विविध सामाजिक  क्षेत्रातील कार्याबद्दल  सेवा गौरव पुरस्कार देवून सन्मान पत्र   व कवितासंग्रहासह सन्मानचिन्ह भेट देवून गौरविण्यात आले.

यात उद्योजक सचिन पगारिया, 

संभाजी आतकरे, 

 रविंद्र काकडे,आदर्श शिक्षक संतोष ताठे, सुरेश हरबडे,अनिता शिंदे,रुपेश ठाकुर,अनंत मुंढे,रतनकुमार साळवे,दिगंबर वाघ,अक्षय सुर्यवंशी,कारभार रोठे,रविंद्र जगतकर,स्वप्नील पवार, यांना सन्मानित करण्यात आले.


या प्रसंगी जूनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी सावधान सावधान पोलीस है अपने साथी या गीतातून मुख अभिनयातून आपली कला सादर केली.

व ठाकुर धोंडीराम राजपूत ( ठाकूर ) यांनी गाडगेबाबाची वेशभुषेत गाडगेबाबांचे विचार मांडले. 

या कार्यक्रमासाठी  माणुसकी समुहाचे सभासद प्रा.शरद सोनवणे, 

कमलाकर माळी,

चेतन पाटील,

देविदास पंडित, आजीनाथ पंडित,

समाजसेवक सुमित पंडित,ज्ञानेश्वर पंडित,कल्पेश पंडित,आकाश ढवळे,

पुजा पंडित,मिराबाई पंडित, यांचेसहकार्य लाभले ,कार्यक्रमाचे सुत्र संचालन ब.सो.कांबळे यांनी केले.व आभार पुजा पंडित यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

जो दुसऱ्याचे सुख दुःख वाटून घेतो तोच खरा माणूस

 .....दीपक पाल भांडेकर महाराज सप्त खंजेरीवादक


महाराजांनी आपल्या वाणीतून समाजाला 

प्रबोधनातुन उपदेश करतांना म्हणाले की समाजामध्ये सेना न्हावी यांच्या अभंगातून मानव सेवा पटवून देत जो दुसऱ्याचे सुख दुःख वाटून घेतो तोच खरा माणूस.मंजर मंजर क्यू घुमता है, पहले सेवा कर गरीबो की.जेका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले.. तोची साधु ओळखावा देव तेथेशी जानावा.. या उक्तीप्रमाणे दीपक पाल भांडेकर महाराज सप्त खंजेरीवादक यांनी सुमित व पुजा यांच्या अहोरात्र समाजासाठी झटत असल्याबद्दल कौतुक केले.ते म्हणाले सुमित यांची भेट एका बेवारस महिलेच्या अंत्यसस्काराच्या वेळी झाली.आणि ह्या तरुणाचे विविध ४४ सामाजिक उपक्रम ऐकूण भारावलो सुमित यांच्या करोना काळातील लोकांसाठी काम ज्यात भुकेल्याला अन्न गरजूंना वैद्यकीय मदत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता केले. यात त्यांना व कुटुबिंयांना कोरोनाने घेरले ही धावपळ धडपड बघून खरच माणसात देव शोधणारा खरा तरुण समाजसेवक मी अनुभवला या सामाजिक योध्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.त्यांनी पुरणातील दाखले देऊन माणूसकी कशी जपावी याचे उदःहरणे दिली ते पुढे म्हणाले की समाजसेवक सुमित पंडित यांनी जे माणुसकीचे छोटेसे वृक्ष लावले आहे आजच्या या कार्यक्रमातून सिद्ध होते की त्यांची कार्याचे फलीत कुठेतरी वटवृक्षात झाले आहे.असे मला वाटते इतर ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा माणुसकी समूहाला ते दान करा आपल्याला निश्चितच माणुसकीचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

        .....दीपक पाल भांडेकर महाराज सप्त खंजेरीवादक.

Post a Comment

0 Comments