Type Here to Get Search Results !

राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान अंतर्गत नाचणखेडा ता. जामनेर येथे वंधत्व निवारण शिबिर संपन्न.


  पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 नाचणखेडा ता. जामनेर येथे राज्यव्यापी वंधत्व निवारण शिबिर अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत नाचणखेडा येथे वंधत्व निवारण शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हर्षल पाटील सरपंच ग्रामपंचायत नाचणखेडा हे होते. प्रमुख पाहुणे  डॉ. श्रीकांत व्यवहारे सहाय्यक आयुक्त जामनेर डॉ. स्वप्नाच्या लोखंडे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जामनेर डॉ. एकनाथ खोडके सहाय्यक पशुधन विकास अधिकारी वाकोद डॉ रवि बीझोटे,श्री दिवाकर पाटील व्हाईस  चेअरमन दूध सोसायटी नांद्रा हे उपस्थित होते

       सर्व प्रथम महामानव डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या प्रतिमे चे पूजन करून  मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सूरवात करण्यात आली व डॉ. स्वप्नजा लोखंडे  मॅडम यांच्या हस्ते गोपुजन करुन उद्घाटन करण्यात आले. श्री अविनाश वाघ नांद्रा प्र.लो यांनी गोमातेवर स्वागत गीत गायन केले. 


कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संदीप पाटील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी नाचणखेडा यांनी केले. यावेळी प्रास्ताविकात वंधत्व निवारण शिबिराचा उद्देश व फायदे याबाबत सविस्तर अशी माहिती दिली. माजाची ची लक्षणे कशी ओळखावी माजावर आलेल्या जनावरांना कुत्रीम रेतन कधी  व कसे करावे याबाबत माहिती दिली गावाची आर्थिक प्रगती होण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम गावात राबवण्याबाबत सांगितले पंचसूत्री कार्यक्रममध्ये 1.पैदास आपल्याच गावात आत्ताच्या पशुधन पेक्षा उच्च जातीचे पशुधन असावे 2.पशुआरोग्य यात लसीकरण उपचार आरोग्य कसे असावे याबाबत सविस्तर सांगितले. 3.चारा -आपल्याच गावात चारा तयार झाला पाहिजे असे आवाहन केले 4.पशुखाद्य -आपल्या परिसरात पशुखाद्य तयार झाले पाहिजे व छोटे उद्योजक गावात तयार झाले पाहिजे 5.व्यवस्थापन- व्यवस्थापना अंतर्गत गोचीड नियंत्रण माशा नियंत्रण गोठ्याची साफसफाई याबाबत सविस्तर माहिती दिली व पंचसुत्री कार्यक्रम यशस्वीपणे राबवून आपल्या गावात पशुपालनाने आर्थिक जीवनमान मोठ्या प्रमाणात बदलून घडून गावात उद्योजक तयार होतील असा विश्वास निर्माण केला.

         पशुसंवर्धन विभागाच्या राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानाबाबत सविस्तर माहिती ,तसेच पशुपालकांनी खनिजे मिश्रणाचा वापर कसा करावा व त्याचे फायदे जनावराची वंधत्व ची कारणे व त्यावरील उपचार याबाबत सविस्तर माहिती डॉ. श्रीकांत व्यवहारे सहाय्यक आयुक्त तालुका लघु पशुचिकित्सालय जामनेर यांनी दिली.

         पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत असणाऱ्या विविध योजना किसान क्रेडिट कार्ड, नाविन्यपूर्ण योजना, राष्ट्रीय पशुधन अभियान अशा विविध योजनेबाबत सविस्तर माहिती डॉ. स्वप्नजा लोखंडे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जामनेर यांनी दिली.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हर्षल पाटील यांनी तरुणांनी दुग्ध व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले आपल्या गावांमधील तरुणांनी पशुपालन व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधावी व आपल्या गावाचे उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले.

      जनावरांची वंधत्व तपासणी डॉ. श्रीकांत व्यवहारे डॉ. एकनाथ खोडके व डॉ. रवी बिझोटे यांनी केली.

     यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री गजानन मोरे श्री संदीप प्रल्हाद पाटील श्री कैलाश पाटील श्री श्रीकांत चौधरी श्री नितीन बाविस्कर श्री सुभाष चौधरी श्री अरुण पाटील सर श्री समाधान चौधरी श्री अरुण कुलकर्णी श्री गजानन पाटील श्री प्रकाश चौधरी आबेद पटेल,बालू पाटिल,धना वनारसे, अन्ना पाटिल ,शिवा पाटिल,गणेश पाटिल मधुकर चौधरी, गोविंद गोतमारे, बंडू पाटिल,शेखर चौधरी व गावातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. संदीप पाटील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक पाटील नांद्रा, डॉ. योगेश पाटील नाचनखेडा श्री अमोल पांढरे परिचर यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments