जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील हाडोळा शिवारात दि.25 रोजी सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवत कळपातील एका शेळी ला ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त असे की , तोंडापूर परिसराला लागुन असलेल्या अजिंठा पर्वताच्या डोंगररांगा असून या परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त वावर मोठ्या प्रमाणात आहे .सोमवार दिनांक २५ रोजी दुपारी गावच्या जवळ पाणीपुरवठा योजनेच्या जवळ हाडोळा शिवारात शेख शफीक शेख शब्बीर यांच्या गट क्रमांक ३२३ या शेतात मजूर कपाशी वेचण्याचे काम करत होते तर शेळ्यांचा कळप हा बांधावर चरत होता या कळपावर अचानकपणे बिबट्याने हल्ला चढवला या कळपातील एका शेळीला त्याने ठार केले त्याच दरम्यान शेतमजूर बांधवांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेबाबत शेख शफीक यांनी गोर् वन परिसरात वनपरिक्षेत्राचे वन विभागाचे वनरक्षक प्यारेलाल महाजन व शिपाई शब्बीर पिंजारी यांना कळविले असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर यश पाटील यांनी ठार झालेल्या शेळीचे विच्छेदन केले. त्यानंतर सायंकाळी ज्या ठिकाणी बिबट्याने शेळीच्या कळपावर हल्ला केला होता, पुन्हा त्याच ठिकाणी बिबट्या आला आणि ठार केलेल्या शेळीला आपली भूक भागविण्यासाठी उचलून घेऊन गेला असल्याचे शेतकरी यांनी सांगितले आहे .भर दुपारी दिवसा बिबट्या गाव परिसरात वावरत असल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्गात भीती निर्माण झाली आहे.
Post a Comment
0 Comments