Type Here to Get Search Results !

आखतवाडे येथे लोकवर्गणीतून उभ्या राहिलेल्या लायब्ररीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न .



लोकवर्गणीतून समाज मोठी मोठी कामे उभी करू शकतात.मंदिरे, शाळा लोक वर्गणीतून बांधलेली आपण गावोगाव पाहत आहोत.मात्र आपण ज्ञानाचे मंदिर लोकवर्गणीतून उभारले याचा विशेष आनंद आहे. 


"ग्रंथालय ही ज्ञानाची देवालये आहेत." असे महात्मा गांधी नेहमी म्हणत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वतः चे घर लायब्ररी करून टाकले होते. त्या घराचे नाव आहे राजगृह.शहीद भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी 113 दिवसाचे जेलमध्ये पुस्तके वाचण्यास मिळावे म्हणून उपोषण केले. समाजाला जागरूक करायचे असेल तर लायब्ररीच्या माध्यमातुन जागरूक करता येवू शकत.' जो नाही वाचत पुस्तक, तो कोणाचाही होईल हस्तक ' आपण कुणाचेही हस्तक होता कामा नये यासाठी लायब्ररीची गरज आहे.


राज्यातील राजकारणात पोरं चोरणारी टोळी फिरते आहे. त्यापासून सावध व्हायचे असेल तर पुस्तके वाचली पाहिजेत.असे मत आखतवाडे येथील लायब्ररी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शिवसेना नेत्या सौ वैशालीताई नरेंद्र सूर्यवंशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी व्यक्त केले.

अश्या लायब्ररी आपल्या संपूर्ण पाचोरा - भडगाव तालुक्यात झाल्या पाहिजेत असे आवाहनही या निमित्ताने केले.


ज्या ज्या लोकांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन प्रसंगी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मनोज सूर्यवंशी, माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ, सौ.संगीता माई, श्री बापू दयाराम गढरी, श्री.प्रवीण राजपूत, श्री अशोक राजपूत, श्री राहुल राजपूत, श्री प्रकाश गढरी, श्री प्रमोद पाटील, श्री दीपक गढरी, श्री रमेश गढरी, दिघी गावाचे सरपंच श्री. रामधन परदेशी,  बदरखे गावाचे पोलीस पाटील श्री. काशिनाथ गढरी, आखतवाडे गावाचे पोलीस पाटिल दगडु गिरासे, युनुसखा पठाण व गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments