Type Here to Get Search Results !

देऊळगाव गुजरी आणि परिसरात शेतकऱ्याच्या शेतात ठिबक सिंचनची मोठी चोरी..शेतकरी चिंतेत.भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा-शेतकऱ्यांची मागणी.


जामनेर  तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील शेतकरी भागवत रघुनाथ पाटील यांचे कापूसवाडी रोडवरच असलेले शेत जमीन गट क्रमांक ४ मध्ये नवीनच जैन कंपनीचे ठिबक सिंचन केलेले असून सालाबदाप्रमाणे यावर्षी सुद्धा  कापूस पिकाची लागवड केलेली होती कापूस पिकाचा सार्वत्रिक फटका बसल्यामुळे रब्बी हंगामात काहीतरी दुसरे पीक घेण्याच्या उद्देशाने पाटील यांनी कामगिरीसाठी शेतातील ठिबकच्या नळ्या जमा करून पाईपलाईनच्या दांड्यावर ठेवलेल्या होत्या परंतु चोरट्यांनी बारीक नजर ठेवून त्याच रात्री त्यांच्या शेताला असलेल्या  तारकंपाऊंड गेट चे कुलूप तोडून आत मध्ये जमा करून ठेवलेल्या सर्व ठिबकच्या नळ्या कापून लंपास केल्याचा प्रकार  दुसऱ्या दिवशी त्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी मात्र ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन चौकशीला सुरुवात केलेली आहे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या निदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कसून चौकशी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments