सध्या जळगांव जिल्हात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे.अशीच ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी दीगर येथे घडली आहे. जामनेर येथील तहसीलदार व त्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यातून अवैधरित्या पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला एक लाख साठ हजार रुपयांचा 118 गोण्या रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. या प्रकरणी जामनेर पोलिसांत दोन जणांविरुद्ध पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांदळासह वाहन (बोलोरो पिकअप) जप्त करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना (दि. 20) गुप्त माहिती मिळाली की, रेशन दुकानाचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. त्यांनी तलाठी नितीन मनोरे, अजय गवते, चेतन ताथे, अभिलाष ठाकरे, प्रमोद इंगळे, राजेश देवले, गोदाम व्यवस्थापक अशोक सोनवणे यांना तात्काळ बोलवून त्यांना माहिती देऊन गोडाऊनवर छापा टाकण्याचे सांगितले. दोन खाजगी वाहनाने दोन पथके जामनेर तालुक्यातील निरीदिगर येथे पोहोचले. त्या ठिकाणी जळगाव रोड लगत भोळे नगर परिसरात कांतीलाल राखबचंद जैन यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये रेशन दुकानात तांदूळ साठवलेला मिळून आला. तो काळा बाजारात विक्रीसाठी पिकअप व्हॅन मध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी तलाठी यांनी तो सर्व तांदूळ जप्त केला. रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोलिसांनी ही कारवाई केली.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
Post a Comment
0 Comments