लोहारा -:- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ. जे. जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे आज 20 डिसेंबर 2023 रोजी कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे ज्येष्ठ संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आबासाहेब भीमराव शामराव शेळके हे उपस्थित होते. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर एस परदेशी , डॉ देवेंद्र शेळके ,दिगंबर नथू चौधरी, श्रावण नामदेव पाटील, अहमद तडवी, पी व्ही जोशी , विकास देशमुख ,भरत पाटील, दत्तू राठोड, शरद देशमुख , उत्तम तात्या शेळके, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके ,ज्ञानेश्वर पाटील, बापूसाहेब युवराज विनायक पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गुरव, पत्रकार बांधव, उपस्थित होते.आलेले मान्यवर व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले , विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ.यु. डी. शेळके मॅडम ,पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे यांच्या हस्ते सरस्वती सरस्वती माता, सद्गुरु हरिप्रसाद महाराज, कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, संत गाडगेबाबा, अण्णासाहेब भास्करराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
विद्यालयातील विद्यार्थिनी इशस्तवन सादर केले. त्यानंतर कै .आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतिपित्तर्थ इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . तत्पूर्वी 19 तारखेला आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतिपित्तार्थ विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यात विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आंतर शालेय वकृत्व स्पर्धेत प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक वैष्णवी भारत पाटील. भारतीय क्रमांक मिताली संदीप काळे. विघ्नहर्ता बक्षीस सुजाता अर्जुन देशमुख प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र ट्रॉफी व 701 रुपयांचं बक्षीस देण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळवणारा विद्यार्थ्याला प्रमाणपत्र ट्रॉफी व 501 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 201 रुपयाचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आले. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून माजी मुख्याध्यापक व्ही के चौधरी व ए टी चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस टी चिंचोले यांनी केले .तसेच बापूसाहेबांच्या जीवनाविषयी माहिती दिली. शिक्षकांमधून श्रीमती एस व्ही पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले . आलेल्या मान्यवरांमधून परीक्षक ए टी चौधरी यांनी आपले मनोगत पर भाषण केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांनी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी . एन. पाटील यांनी केले. व आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments