पाचोरा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न १० जानेवारीपर्यंत मार्गी लावा अन्यथा १२ जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अॅड. अभय पाटील यांनी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
हे निवेदन देताना अॅड. अभय पाटील, एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, फईम शेख, नरेश पाटील, संतोष पाटील उपस्थित होते. राज्यासह पाचोरा, भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांचा खरीप व रब्बीचा हंगाम ही दुष्काळामुळे नष्टच झाला आहे. अशातच नोव्हेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे कपाशी, तूर, सोयाबीन व मोसंबी या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कपाशीवर बोंडअळीचा प्रार्दुभाव झालेला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रब्बीत लावलेल्या मका, हरभरा, ज्वारी या पिकांचे ही नुकसान झाले आहे. असे असतांना पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. सरकारने जाहीर कलेली गतवर्षाची नुकसानीची रक्कम ही अद्याप खात्यात पडलेली नाही. सरसकट पिक विमा अग्रीम रक्कम ही मिळालेली नाही. सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झालेले असतांना या दोन्ही पिकांना अनुक्रमे ९ अॅड. अभय पाटील यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी हजार रुपये व १२ हजार रुपये असा भाव जाहीर करुन सरकारने शेतकऱ्यांच्या कपाशीचे मूल्यांकन करुन त्यांना याप्रमाणे अनुदान जाहीर करावे.
दोन्ही तालुक्यात राज्य व केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व विभागांच्या सर्व योजनांसाठी तहसील कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करावी. या मागण्या १० जानेवरीपर्यंत मान्य न झाल्यास १२ जानेवारीपासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसू, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच इतर मार्गाने ही आंदोलन करु. त्याच्या परिणामांना आपण व्यक्तीशः जबाबदार रहाल, अशा आषयाचे निवेदन अॅड. अभय पाटील यांनी प्रांत भूषण अहिरे यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, आ. किशोर पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment
0 Comments