Type Here to Get Search Results !

जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथे राजपूत समाजाच्या वतीने गोगामेडी यांच्या हत्येचा निषेध.


जामनेर वार्ताहर कृष्णा पाटील

जामनेर - तालुक्यातील तोरणाळे येथे पाच डिसेंबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव दादा गोगामेडी यांची राजस्थान येथे राहत्या घरी झालेल्या हत्याप्रकरणी सकल राजपूत समाजाच्या वतीने  तोरणाळे गावामध्ये दि.११/१२/२०२३ रोजी सकाळी ८ वा. हनुमान मंदिर बस स्टॅन्ड येथे गावातील राजपूत तरुण मित्र मंडळ तसेच वयोवृद्ध व इतरही समाज बांधवांकडून  निषेध व्यक्त करण्यात आला .


हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी.अशी घोषणा देऊन प्रशासनाला सगण्यात आले. अमर रहे अमर रहे क्षत्रिय हृदय सम्राट राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय राजपूत करणी सेना क्रांतिकारी समाज नेते  कै.सुखदेव सिंह (दादा) गोगामेडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून सर्व गावातील  बाल ,वृद्ध, तरुण मित्रांनी व परिसरातील सर्व जाती धर्मांच्या लोकांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय राजपूत करनी सेनेचे संस्थापक अध्यक्ष कै.सुखदेव दादा गोगामेडी यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करून गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी प्रशासनाकडे केली असून या ठिकाणी तीव्र निषेध नोंदविण्यात आला यावेळी गावातील व परिसरातील सर्वच राजपूत समाज बांधव तसेच इतरही कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली पाहायला मिळाली.



Post a Comment

0 Comments