Type Here to Get Search Results !

No title



नेरी बु।। प्रतिनिधी:-

जळगाव जिल्ह्यातील वाघूर जलाशयात, जलाशय परिसरातील पारंपारिक मच्छीमार जो जामनेर, नेरी बु।।, लोहारा, कळमसरा, नाचणखेडा, हिंगणे, खादगांव, टाकरखेडा, नेरी दिगर, तोंडापूर, पहूर, पाळधी, वाकोद, वाकडी यासह गांवपरिसरातून आपल्या उदर निर्वाहासाठी मच्छीमारी करत असतो परंतु सदरच्या जलाशयात पुन्हा ठेकेदारी पध्दतीचा शिरकाव झाल्याने पारंपारिक मच्छीमार समाजाच्या हक्कावर नविन ठेकेदाराने अनेक बंधने घालण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे त्यातूनच परिसरातील पारंपारिक मच्छीमार समाजाने आपल्या हक्कासाठी उद्रेकच केला. जामनेर मतदार संघाचे विद्यमान आमदार तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री मा श्री गिरीशभाऊ महाजन यांची जामनेर स्थित त्यांच्या कार्यालयावर मच्छीमार घटकाने भेट घेतली असता, परिसरातील पारंपारिक मच्छीमार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल आणि पारंपारिक मच्छीमार समाजाची पिळवणूक होऊ दिली जाणार नाही १००% पारंपारिक मच्छीमार समाजाला न्याय दिला जाईल असे आश्वासन देऊन, मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे असे त्यांनी सांगितले यावेळी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आत्माराम शिवदे, समाजसेवक, क्रांतीदलाचे पदाधिकारी तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी रविंद्र खुशाल भोई, नेरी बु।। येथील माजी सरपंच तसेच मच्छीमार नेते रतीलाल भोई, किरु मामा प्रदीप भोई भागवत भोई सुरेंद्र भोई गोटू भोई आकाश भोई सुनील भोई विनोद भोई किशोर भोई मनोज भोई अमर भिल विजय भोई किरण मोरे गोविंदा भिल प्रकाश भोई प्रशांत भिल अमर पाटील आकाश भिल रामदास कोळी समाधान भोई परशुराम कोळी नाना भोई सुभाष वाघोडे भागवत इंगळे दिलीप सर... आदीसह आजूबाजूच्या १२ ते १४ खेडे परिसरातील मच्छीमार मंडळी यावेळी हजर होती.

Post a Comment

0 Comments