Type Here to Get Search Results !

आज दिनांक 29 डिसेंबर 2023रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची 171 वी बैठक रेल प्रबंधक DRM इती पांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यात पाचोरा जंक्शन वरील विविध समस्या रेल्वे सलगर समिती सदस्य दिलीप पाटील यांनी मांडल्या,


यातील प्रमुख बाब म्हणजे पाचोरा जंक्शन च्या सौंदर्यकरणात भर म्हणून इतिहासकालीन pj रेल्वेचे इंजिन पाचोरा जंक्शन च्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात यावे या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात येऊन या आशयाचे मंजुरी पत्र दिलीप पाटील यांना देण्यात आले, पाचोरा रेल्वे जंक्शन वर प्रवाशांची काळजी घेणारे आर पी एफ पोलीस सुरवाडे दादा यांचे कौतुक दिलीप पाटील यांनी करत त्यांना पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती केल्याने त्यांना तात्काळ पुरस्कार देण्यात येईल असे  Drm मॅडम यांनी घोषणा केली,

 तसेच पाचोरा जंक्शन वरील इतर सर्वच समस्या दिलीप पाटील यांनी मांडल्या असून अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत आल्याने सर्वच समस्या सुटणार असल्याचे सविस्तर माहिती देण्यात आली,

 महाराष्ट्र एक्सप्रेस व पॅसेंजर मेमु ट्रेन पूर्वत होण्यासंबंधी विनंती करण्यात आली,

या सर्वच समस्या व सूचना ऐकून घेत या सर्वच समस्या मान्य करून त्या सोडू तसेच इतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन भुसावळ मंडळातर्फे देण्यात आले,

   यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सर्वच सदस्य, उपस्थित होते,

  रेल्वे सल्लागार समिती सदस्य दिलीप पाटील यांना लेखी उत्तरे देऊन, उत्साहपूर्ण वातावरणात सदर बैठक पार पडली,

Post a Comment

0 Comments