जळगाव : येथील महानगर- पालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक महेश रतन चौधरी (वय ५१) यांचे हृदयविकाराने शुक्रवार दि. ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे १ सात वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले आहे. एका त्यांना भाजपाकडून जळगाव महानगरपालिकेत पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी
मिळाली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी
संध्याकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. महेश चौधरी हे तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील आर. टी. चौधरी हेदेखील माजी नगरसेवक असून शिक्षण मंडळाचे सभापती देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
सात वर्षांत त्यांच्या परिवारावर मागून एक आघात झाले असून आधी आजाराने भावाला गाठले, तरूण पणात मुलगा गेल्याने धसका घेवून वडील आर.टी.चौधरी यांचे निधन झाले. त्यानंतर सहा महिन्यातच आईचे निधन झाले व आता महेश चौधरी यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे खूप हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments